Share

मोठी बातमी : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण!

Published On: 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कारवायांमुळे त्यांना राजकीय मंडळी , व्यापारी, अवैध धंदे करणाऱ्या अनेक माफियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले असले तरी कामाची पद्धत त्यांनी कायम ठेवली असल्याचे कोरोना काळात देखील पाहायला मिळाले होते.

मात्र, आज सकाळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. कोरोना काळात देखील प्रत्यक्ष स्थळी जाऊन युद्ध पातळीवर प्रशासनाच्या सर्व कामांचा वेळोवेळी आढावा ते घेत होते. मनमानी करणारे खाजगी रुग्णालये असो वा कडक लॉकडाऊनबाबतची भूमिका त्यांच्या कामाच्या तत्परतेमुळे चर्चेत राहिले आहेत.

काँग्रेसचे अध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याकडेच!

आज सकाळी त्यांनी एक ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. ” माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला लक्षणे नसली तरी प्रोटोकॉल प्रमाणे स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. मागील १४ दिवसांच्या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मी घरातून काम करत आहे. आपण जिंकूच!” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

#फेक : पुण्यातील मेट्रो ब्रीज कोसळल्याचे व्हायरल फोटो खोटेच!

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील प्रत्येक दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. चाचणी न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला होता. तर, राज्यातील कोरोना चाचण्यांची असलेली मर्यादा, त्यासाठी लागणारा खर्च तसेच इतर अत्यावश्यक बाबी लक्षात घेता राज्य सरकारतर्फे एका परिपत्रकाद्वारे कोरोना चाचणी करण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. या पत्रकानुसार लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना आता कोरोना चाचणीची गरज नसल्याने नागपुरातील हजारो व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

…अन् वकिलानेच पाठवली पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!