Share

काँग्रेसचे अध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याकडेच!

Published On: 

नवी दिल्ली : काल (सोमवारी) काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक पार पडली यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तब्बल ७ तास झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुढचे ६ महिने सोनिया गांधी यांच्याकडेच अध्यक्षपदाची सूत्रे ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसच्या या ऑनलाइन बैठकीला आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी स्वरूप आले होते. तर, तब्बल २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त करत अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त असावा यासाठी आधीपासूनच भूमिका घेतली होती. मात्र, तूर्तास तरी पुढील ६ महिन्याच्या कालावधीसाठी सोनिया गांधी याच हंगामी अध्यक्ष राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#फेक : पुण्यातील मेट्रो ब्रीज कोसळल्याचे व्हायरल फोटो खोटेच!

दरम्यान, ‘काँग्रेसच्या अध्यक्षपदी यापुढे गांधी घराण्यातील व्यक्ती नको’ असे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केले होते. तर, २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाची नैतिकता स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, त्यांनी देखील काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.

बार्शीचे राजकारण नवे वळण घेण्याची शक्यता, बाळराजे पाटील-अनगरकरांचा बार्शी संपर्क वाढला…

काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. ज्यातील एक गट हा सोनिया गांधी यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदी राहावे अशी मागणी करणारा आहे. तर, दुसरा गट हा गांधी घराणे सोडून इतर अध्यक्ष करावा या विचारांचा आहे .

…अन् वकिलानेच पाठवली पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!