Share

अर्जुन कपूरला सोडून मलायका करतीये ‘या’ अभिनेत्याबरोबर रोमॅन्स; व्हिडिओ झाला व्हायरल…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय शो आहे. हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे तिन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सगळ्यांना माहित आहे की, शिव एक खूप चांगला डान्सर आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो एका खास व्यक्तीसोबत डान्स करताना दिसत आहे. ती म्हणजे बॉलिवूड बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा सोबत तो रोमान्स करताना दिसत आहे.

शिवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो अभिनेत्री मलायका अरोरासोबत रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘अजब सी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ज्यात दोघेही रोमँटिक अंदाजात त्याच्या पायावर बसलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है.” या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मलायकाने पिवळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तसेच त्यावर तिने चॉकलेटी रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच शिव ने देखील काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि चंदेरी पँट परिधान केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडला आहे.

शिवने या आधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि विणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. शोमध्ये असताना त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. तसेच एका टास्कमध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. तसेच घराच्या बाहेर आल्यानंतर वीणाने देखील त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु अलीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच वीणाने तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू देखील हटवला आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!