मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. म्हणाले, “आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवून देऊ”.
तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्यावरचं संकट दूर होऊ दे, सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना केली. आणि “केमिकल रंग शरीराला घातक आहेत म्हणून नैसर्गिक रंगाचा पावर करून धुळवड साजरी करा. पर्यावरणपूरक होळी साजरी करा”, असे सांगितले. याचबरोबर कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही, त्यामुळे सगळ्यांनी नियम पाळून सण साजरे करा, आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन देखील त्यांनी केले.
श्रीकांत शिंदे –
कोविड काळात दोन वर्षं आपण घरातच सगळे सण साजरे केले. आता 2 वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थाने सण साजरे करत आहोत. त्याचा आनंद आहे. पण सगळ्यांनी काळजी घ्या, असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या बातम्या –


