Share

“काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”

Published On: 

मुंबई : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३ ,२७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे . तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे.भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची ‘मोट’ बनला आहे.अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून काँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही. आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा राहिलेला नाही. फक्त उत्पल पर्रीकर काय करतात तेवढेच आता पाहायचे ? उत्पल जिद्दीने मैदानात उतरले व लढले तर भविष्यात ते गोव्याचे नेते होतील. पण त्यांची लढाई भाजपच्या बेइमानीविरुद्ध आहे हे त्यांनी विसरू नये.’

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून गेलेले अनेक आमदार पुन्हा बाहेर पडले आहेत. एक आमदार रेजिनाल्ड यांनी तर तृणमूलमध्ये आपण कसे गुदमरलेल्या अवस्थेत दिवस काढले ते जाहीर केले आहे. केजरीवाल यांनी सध्या पणजीतच मुक्काम ठोकला आहे व काँग्रेस पक्षाचे जहाज नक्की कोणत्या दिशेने चालले आहे ते कप्तानालाही माहीत नसावे. गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. काँग्रेसने शहाणपणा दाखवला असता तर महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग करता आला असता व तो यशस्वी झाला असता. पण काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला आहे की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली आहे व साधारण वीसेक जागांवर त्यांचे उमेदवार लढत आहेत. हे खरे असले तरी विरोधकांच्या विस्कळीतपणाचा फायदा भाजपला होईल काय? हा प्रश्न आहेच, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!