🕒 1 min read
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी ‘त्याला मी मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’ वक्तव्य ज्या मोदीसाठी केले होते, अखेर तो गावगुंड सापडला आहे. नागपुरात हा कथित गावगुंड समोर आला आहे. त्याने पत्रकार परिषद घेत ‘मी दारू विकतो आणि दारूच्या नशेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यास शिवीगाळही केली’ असे म्हटले आहे. आता यानंतर नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“हा बघा “मोदी” (टोपणनाव) असलेला व्यक्ती सापडला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करुन पंतप्रधान पदाची गरिमा राखता आली नाही.” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
हा बघा "मोदी" (टोपणनाव) असलेला व्यक्ती.
भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्तांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi) जी यांची प्रतिमा मलीन करुन पंतप्रधान पदाची गरिमा राखता आली नाही. @BJP4India@PMOIndia@INCMaharashtra@INCIndia pic.twitter.com/xETFXJgZHl
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 21, 2022
दरम्यान उमेश प्रेमदास घरडे असे या कथित गावगुंडाचे नाव असून त्याच्या गोंदी गावातील लोक त्याला ‘मोदी’ म्हणून ओळखतात असेही तो म्हणाला आहे. या कथित मोदीसोबत अॅड. सतीश उके उपस्थित होते. या ‘मोदी’ने नाना पटोलेंनी ज्या मोदीला मारण्याची भाषा केली, तो मीच आहे. असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी उमेशच्या नावापुढे मोदी लिहिले असलेली काही जुनी कागदपत्रेही दाखवली. त्यामुळे अखेर नाना पटोले यांनी ज्या मोदीबद्दल अपशब्द वापरले होते तो सापडला आहे. भाजपने मात्र नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. नाना पटोले यांच्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलनही केले.
महत्वाच्या बातम्या:
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
- “गोव्यातील भाजपमध्ये फुटताय बंडाळीचे फटाके”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- आप आणि शिवसेनेच्या ऑफरवर पर्रिकरांचे उत्तर; म्हणाले,“माझ्या पार्टीच्या ऑफर स्वीकारल्या नाही, तर इतरांच्या….”
- मुख्यमंत्र्यांना मुंबईबाहेर महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? चंद्रकांत पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
