Share

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा रद्द

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून सुरू होणारा तीन दिवसांचा रशिया दौरा रद्द केला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे आता या दौऱ्यात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रशिया दौऱ्यात गुंतवणूकविषयक करार करण्यात येणार आहेत.

पुरात आतापर्यंत चाळीस जणांचा मृत्यू झाला असून साडे चार लाखावर नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं आहे. या पुरामुळे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे. गेल्या मंगळवारपासून शेकडो वाहनं या मार्गावर उभी आहेत. या मार्गावरच्या पुलांवर आलेलं पाणी आता ओसरत असल्यानं, आज हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुराचं पाणी हळूहळू ओसरत आहे. कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून पाच लाख ३० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले असून, त्यामधून चार हजार २५६ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. तर कोयना धरणामधून ५३ हजार ८८२ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली.दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागाची हवाई पाहणी करून माहिती घेतली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!