Share

‘या’ मंत्र्याच्या माजाला म्हणायचं तरी काय’ ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले असून पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. परंतु पूरग्रस्तांच्या प्रश्नावर त्यांची जीभ घसरलेली पाहायला मिळाली. त्यांनी पूरग्रस्तांना माहिती देताना ‘शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला पार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता सरकार पाठिशी आहे याची खात्री बाळगा. हे सर्व आपण नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही, सूचना करा असं विधान केले.

याच दरम्यान चंद्रकांत पाटील बोलत असताना खालून एक व्यक्ती तक्रारीच्या सुरात आपलं म्हणणं मांडत होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळं करु, सगळं करु…. त्यावेळी पुन्हा ती व्यक्त बोलू लागल्याने चंद्रकांत पाटलांचा संयम सुटला आणि ते ओरडले ये… गप्प अशा शब्दात नागरिकांवर राग व्यक्त केला. पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

यावर आता कॉंग्रेसने चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पूरग्रस्त आधीच सरकारच्या नाकर्तेपणाची फळं भोगत असताना जेव्हा आपली वेदना मंत्र्यांकडे मांडतो त्यावेळी तक्रारी करून काही होणार नाही, ए गप्प अशी ‘दादा’गिरीची भाषा वापरली जातेय. मंत्र्यांच्या या माजाला म्हणायचं तरी काय? या उन्माती सरकारला उताणे केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही ! अस ट्विट महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊन्ट वरून केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!