नवी दिल्ली : कोरोना काळात टाळेबंदीमुळे सर्वच आपापल्या घरात अडकले होते. यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळले तर सर्वानाच घरातून काम करावं लागलं होतं. कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्याचे या काळात चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. याकाळात गृहकलह वाढल्याने अनेकांनी थेट घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ही यादी तयार केली आहे. मागील अनेक दशकांपासून व्यवस्थापनसांदर्भातील संशोधनामध्ये राजेश हे कार्यरत असून भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती त्यांच्या या प्रोजेक्टमुळे पहिल्यांदाच समोर आली आहे.
ही यादी वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच जीवनशैली यांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचेही दिसून आले आहे. हा सर्वेक्षण जरी ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आला असला तरी लॉकडाऊन काळातील घटनांचा देखील यावर परिणाम झाला असल्याचं नाकारू शकत नाही.
राज्यात आनंदी शहरांमध्ये पुणे अव्वल !
देशातील एकूण ३४ आनंदी शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ अंतर्गत ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पुणेकरांनी राज्याची राजधानी असलेल्या मुंबई व उपराजधानी असलेल्या नागपूरला देखील पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे पुणे हे राज्यातील आनंदी असलेल्या शहरांमध्ये अव्वल ठरले आहे. अर्थातच, विद्येचं माहेरघर आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या या शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- खासदार रवी किशन हे संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
