बंगरुळू: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अद्याप देखील न सुटलेला प्रश्न आहे. यावर 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात आला. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्यामुळे या सीमावर्ती भागामध्ये नेहमीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतो. १ नोव्हेंबरला राज्य सरकारकडून सर्व मंत्री काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता. तर यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्राची सर्वागीण वाढ झाली असून बेळगाव, कारवार, निपाणी हे कर्नाटकातील भाग महाराष्ट्रात आणावेत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगावी संदर्भात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केलेल्या विधानाचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी निषेध केला असून पवार यांच्या या वव्याने या प्रश्नाची आग आणखी भडकेल असे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. महाजन आयोगाचा अहवाल अंतिम आहे हे माहिती असताना त्यांनी हे विधान केले. बेळगावीतील मराठी लोक हे आमच्या राज्यासाठी कन्नडिगांसारखे आहेत. मराठी लोकांच्या विकासासाठी आम्ही येथे महामंडळ स्थापन केले आहे. येडीयुरप्पा यांनी सांगितले, की बेळगावी विश्व कन्नड संमेलन २०११ मध्ये झाले होते, त्यात मराठी लोक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मग अशी परिस्थिती असताना अजित पवार आणखी आग का लावत आहेत. हे निषेधार्ह असून आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी अशी विधाने यापुढे करू नयेत.
महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात बेळगावीच्या ताब्यावरून सीमा वाद असून महाराष्ट्राने तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीत असलेल्या बेळगावी जिल्ह्य़ावर भाषिक तत्त्वावर दावा सांगितला आहे. कर्नाटक सरकारने बेळगावी हा त्यांच्या राज्याचा एकात्म भाग असल्याचे म्हटले असून तेथे सुवर्ण विधान सौधाची निर्मिती केली आहे. बेंगळूरुत जशी विधान सौधाची इमारत आहे तेथे विधानसभा अधिवेशन होते तसे आता वर्षांतून एकदा विधानसभेचे अधिवेशन बेळगावीतही होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोकणाची मुख्यमंत्री निधीकडून उपेक्षा सुरूच,पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी’
- चैत्यभूमीची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेकडून २९ कोटीचा राखीव निधी
- ती’ नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगणावर राऊतांचा हल्लाबोल
- वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल : मनसे
- आयकर विभागाची नोटीस येताच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

