Share

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री रात्री ८.३० वाजता साधणार महाराष्ट्राशी संवाद

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

याच प्राश्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

यानंतर मुख्यमंत्री रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार की राज्यातील निर्बंध अजून कडक होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्यापासून पुढील सात दिवस पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून हॉटेल, मॉल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सर्व धार्मिक स्थळे पूर्ण बंद ठेण्यात येणार आहेत तर सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी सनर आहे. त्याच प्राश्वभूमिवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!