Share

अर्जेरिया शरदचंद्रजी : कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव,दुर्मिळ वनस्पतीला शरद पवारांचं नाव

Published On: 

मुंबई – खा.शरद पवार हे राज्याच्याच नव्हे देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांचं नेहमीच कौतुक केलं जातं. त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव दोन तरुण वनस्पती शास्त्रज्ञांनी अनोख्या पद्धतीने केला आहे.

सह्याद्री पर्वत रांगेत कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञांनी नव्या वनस्पतीचा शोध लावला असून या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावे समर्पित करण्यात आले आहे.

कोल्हापूरमधील दोन तरुण संशोधक डॉ. विनोद शिंपले व डॉ. प्रमोद लावंड यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये प्रथमच आढळलेली ही वनस्पती आहे.

दरम्यान,ही वनस्पती गारवेल कुळातील आहे.अशा प्रकारच्या वनस्पती फक्त आशियातच आढळतात. या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात आणि डिसेंबरपर्यंत ही वनस्पती फळे देते.

या वनस्पतीच्या शोधाची माहिती कालिकत विद्यापीठामधून प्रकाशित होणाऱ्या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथामधून प्रकाशित करण्यात आली आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल ट्विटरवरुन संशोधकांचे आभार व्यक्त केले.“सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं आदरणीय साहेब मानतात.असा आदर व सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले.याचा मला नितांत आदर आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!