मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्याने मराठी नाट्यसृष्टी आता चांगलीच धास्तावली आहे. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर बंद असणारी नाट्यगृहं ९० दिवसांआधी सुरू झाली आहेत. नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी लॉकडाऊनमुळे पुन्हा कोलमडून पडेल आणि रंगकर्मींची अवस्था वाईट होईल, या भितीपोटी रंगमंच कामगार, निर्माते आणि कलाकारांनी लॉकडाऊन करू नका अशी कळकळीची विनंती राज्य सरकारला केली आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, निवेदिता सराफ, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, निर्माते-दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, भारत जाधव, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री निर्मिती सावंत, प्रतीक्षा लोणकर, कविता मेढेकर आदी कलाकारांनी चित्रफित तयार करून उपाययोजनांची कठोरतेने अंमलबजावणी करा परंतु नाट्यगृह बंद करू नका असे’ असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘चिंता नको… ! पवारसाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा !


