🕒 1 min read
अहमदाबाद : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सामन्यात दुसऱ्या डावातील बारावे षटक सुरु असताना शिखर धवनने लेग साइडच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर त्याने फाइन लेगच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चेंडू सरळ यष्टिरक्षक कार्तिकच्या हाती गेला. यावेळी कार्तीकचा पाय क्रिझच्या आत असतानाही त्याला यष्टीचीत केले. यावेळी अपील केल्यानंतर कार्तिकने धवनच्या पायाकडे इशारा करत काहीतरी पुटपुटला. त्यानंतर धवन देखील रागाने मैदानावर गुडघ्यांवर बसल्याचे पाहायला मिळाले होते.
Never a dull moment when @SDhawan25 is on the field. ???? @DineshKarthik ????????????????https://t.co/GDR4bTRtlQ #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/lwohB8NNou
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
मात्र पुढच्याच क्षणी दोघेही हसायला लागले आणि हाथ देखील मिळवला. यानंतर लक्षात आले की ते केवळ एकमेकांची मजा घेत होते. तिसऱ्या अंपयारने देखील धवनला नॉट आऊट घोषित केले होते. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी १३२ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. यात शॉने ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. तर शिखर धवनने देखील ४७ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती. तसेच या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धवजी सांगा गरिबांनी जगायचं कस?
- कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा; १०२ वर्षीय कोरोनामुक्त आजींचा मोलाचा सल्ला
- कोरोनाच्या संकटात मास्टर ब्लास्टर सचिनने केला मदतीचा हात पुढे
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे – रामदास आठवले
- मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
