सोलापूर : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.
विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या १ दिवसाच्या दौऱ्यामध्ये ते अक्कलकोटमधील गावांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर शेतीचं झालेलं नुकसान बघावं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली जात आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली असून यावेळी त्यांनी, ‘शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी’, अशी मागणी केली आहे. यावर, उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अतिवृष्टी होऊ नये ही माझी प्रार्थना करत आहे. पंचनामे सुरू आहे. माहिती घेत आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर ‘राज्याची थकीत येणी जर केंद्राकडून वेळेत आली तर मदतीसाठी हात पसरावे लागणार नाहीत. केंद्राने विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दुजाभाव करू नये’ असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, ‘राज्य सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी नाराज होऊन जीवाचं बरं-वाईट करू नये’ असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- ६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?
- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ‘अर्णब गोस्वामी’ची उच्च न्यायालयात धाव


