Share

१८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण, जिल्हयासाठी हव्यात २० लाख लसी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अठरा वर्षावरील युवकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाची तयारी झाली असून राज्य शासनाच्या गाइडलाइन्सची प्रतीक्षा असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. जिल्ह्यासाठी किमान १८ ते २० लाख लसींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात आता १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एक मेपासून लसीकरण प्रारंभ होणार होते. मात्र लसींची उपलब्धता नसल्याने येत्या १५ मेपासून लसीकरण सुरू होईल, अशी शक्यता आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्ष वरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. याच टप्प्यातील लसीकरण कळीचा मुद्दा बनला आहे. शहरासह ग्रामीण भागात लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावत आहेत. मात्र लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. शहरातही काल दुपारनंतर लसीचा तुटवडा जाणवला. दररोजच लस न मिळाल्याने अनेकांना माघारी परतावे लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जवळपास २० लाख नागरिकांचे लसीकरण होणार तरी कसे ?असा सवाल विचारला जात आहे. आता प्रतीक्षा मार्गदर्शक सूचनांची.

राज्य शासनाने अद्याप १८ वर्षावरील तरुणांच्या लसीकरणाबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी केल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह मनपा आरोग्य विभागही गोंधळलेला दिसतो. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता शासनाकडून कोणत्याही गाईडलाईन्स प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे त्याबाबतची कार्यवाही सुरू नाही. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यावर सध्या काम केले जात असून शासनाच्या गाईडलाईन प्राप्त झाल्यानंतरच पुढील तयारीचा आढावा घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!