🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याकडे भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे आली आहेत. आजपासून चौधरी हे चीफ मार्शल म्हणून काम करतील.
दरम्यान, चौधरी हे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख होते. विवेक राम चौधरी यांचा २ डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या विभागात समावेश केला गेला होता. त्यांना आतापर्यंतच्या सेवेदरम्यान परम विशिष्ठ सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदक देऊन गौरवण्यात आले आहे.
तर ३,८०० तासांहून अधिक उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे आणि ते मिग 29 विमानांचे तज्ज्ञ देखील आहेत. वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. विशेष म्हणजे ते महाराष्ट्रातील नांदेडचे सुपुत्र आहेत. एअर चीफ मार्शल पदी चौधरी यांची निवड करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय हवाई दलाचे नूतन प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. जगातील बलशाली दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्र सुपुत्र श्री. चौधरी यांची नियुक्ती झाल्याने हवाई दलाच्या पंखात आणखी बळ येईल. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
– मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 30, 2021
‘भारतीय हवाई दलाचे नूतन प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. जगातील बलशाली दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्र सुपुत्र चौधरी यांची नियुक्ती झाल्याने हवाई दलाच्या पंखात आणखी बळ येईल. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- गोवा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन संजय राऊतांनी पक्षाची इभ्रत घालवली : दरेकर
- पुणे महापालिकेने केला सावित्रीबाईंचा ‘साध्वी’ असा उल्लेख; फलकावरून नवा वाद
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

