Share

गोवा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन संजय राऊतांनी पक्षाची इभ्रत घालवली : दरेकर

Published On: 

पुणे : पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. गोव्यासह अन्य पाच राज्यांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना देखील महाराष्ट्राबाहेर आपली ताकद वाढवण्यासाठी निवडणुका लढत आहे. बिहारनंतर आता उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना लढणार असल्याचं समोर येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे गोवा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार, अशी घोषणा केली आहे. गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. तर त्यांनी सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांना आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘गोव्यात आपलं किती बळ आहे न तपासता संजय राऊत बोलतायत. बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची काय अवस्था झाली हे त्यांनी बघावं. भाजपच्या द्वेषापोटी निवडणुका लढवून त्यांना समाधान मिळवायचं आहे. बाहेरच्या निवडणुकीत त्यांना एक टक्काही मतं मिळाली नाहीत. त्यामुळे संजय राऊत स्वतःहून आपल्या पक्षाची इभ्रत घालवण्याचं काम करतायत, त्यांना शुभेच्छा आहेत,’ असा खोचक टोला दरेकर यांनी राऊतांना लगावला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते ?

‘शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱ्यात मला भेटणार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु,’ असा शब्द देखील संजय राऊत यांनी दिला आहे.

त्यांनी भाजप सरकारवर देखील शरसंधान साधलं आहे. ‘कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते,’ असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!