🕒 1 min read
पुणे : महान व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, शुद्ध आणि नेमक्या भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातच महापालिकेने मोठी चूक केल्याचे समोर आले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे असलेल्या एका उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाईंचा उल्लेख करताना पुणे महापालिकेने घोडचूक केली आहे. उद्यानाच्या फलकावर ‘साध्वी’ सावित्रीबाई फुले उद्यान असे लिहिण्यात आले आहे.
यावरून समाज माध्यमांमध्ये तीव्र आक्षेप नोंदवला जात असून पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी देखील एक फेसबुक पोस्ट लिहून पुणे महापालिकेवर सडकून टीका केली आहे. ‘हे असे ‘ साध्वी’ सावित्रीबाई फुले लिहिणे बरोबर नाही. सावित्रीबाई आमच्या मार्गदर्शक, कधी मैत्रीण, कधी कृतिशील रणरागिणी तर कधी रचनात्मक कार्यकर्ता आहेत,’ असं सरोदे यांनी म्हटलं आहे.
https://www.facebook.com/asimsarode/posts/10159492021735185
‘आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण व हिंदुत्ववादी विशेषणे लावून धार्मिकीकरण करणे चुकीचे वाटते. प्रा. हरी नरके यांनी या फलकावरील खोडसाळ शब्द काढण्यात यावा यासाठी काहीतरी करावे. पुण्याचे कार्यतत्पर महापौर मुरलीधर मोहोळ यांना माझी विनंती आहे या अशी पाटी आजूनही असेल तर या पाटीवरील ‘साध्वी’ हा शब्द खोडावा आणि त्याबद्दल कार्यवाही केल्याचे सोशल मिडियावर जाहीर करावे,’ अशी मागणी देखील सरोदे यांनी केली आहे. तर, या प्रकरणी महापौर मोहोळ यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
महापौरांवर टीकास्त्र –

महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- गोवा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन संजय राऊतांनी पक्षाची इभ्रत घालवली : दरेकर
- अभिमानास्पद ! हवाई दल प्रमुखपदी मराठमोळ्या व्ही आर चौधरी यांची वर्णी
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

