🕒 1 min read
मुंबई:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंल आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरून आता मनसेने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. औरंगाबादच्या नामांतराची इच्छा हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची अनेक वर्षांची होती आता त्यांची अपुरी राहिलेली इच्छा त्यांचे पुत्र व विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पूर्ण करावी अशी मागणी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तसेच ह्या प्रकरणात इतर पक्षांनी राजकारण आणू नये. उद्धवजी ठाकरे कोणत्याही दबावाला बळी न पडता लवकरात लवकर निर्णय घेतील, असेही राजू पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- तैमुरच्या मित्राला शुभेच्या देत करीनाने शेअर केला गोंडस फोटो
- उदयनराजेंचा शब्द राखला ! तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध
- अँजिओप्लास्टी नंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर
- सावित्रीबाई फुले मालिका टीआरपी अभावी बंद करावी लागते हे दुर्दैव कोणाचे ? : रोखठोक
- ब्रिस्बेनला जाण्याची टीम इंडियाची का इच्छा नाही ? जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
