Share

रात्रीत कलम 370 हटवलं, हे आरक्षण देखील काढून टाकतील – आव्हाड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारचा काही भरवसा नाही, त्यांनी एका रात्रीत काश्मीरमधील कलम 370 काढून टाकले, रात्रीत आरक्षण देखील काढून टाकू शकतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. लातूरमध्ये आयोजित लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशनात आव्हाड बोलत होते. यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात सरकारने समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. आरक्षण हवं आहे, हे लिंगायत समाजाने ठणकावून सांगायला पाहिजे. असं मत यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

सत्तेवर येण्यापूर्वी सरकारमधील नेत्यांनी अनेक घोषणा केल्या, धनगर समाजाला पहिल्या अधिवेशनात आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. सरकारने आजवर आपला शब्द पाळला नाही, अशी टीका आ. विक्रम काळे यांनी केली. मुख्यमंत्री 31 ऑगस्टला लातूरमध्ये येणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी लिंगायत आरक्षणाचा निर्णय घ्यावा. अन्यथा समाज काय तो निर्णय घेईल, असा इशारा देखील काळे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!