Share

पाहणीची नौटंकी बंद करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Published On: 

उस्मानाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची नौटंकी बंद करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अतुल गायकवाड यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केलीआहे.

गायकवाड म्हणाले की ‘उस्मानाबाद, कळंब या दोन्ही तालुक्यासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या झालेल्या अतिवृष्टीमुळेच जिल्ह्यात पिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सोबतच अनेक ठिकाणची जमीन देखील खरडून गेली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे देखील सुरू आहेत. मात्र ही नेतेमंडळींनी केवळ पाहणी करीत असून शेतकऱ्यांना ठोस मदत कोणीही जाहीर करत नाही. त्यामुळे या संकट काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असताना, ही नेतेमंडळींनी मात्र केवळ पाहणी दौरे करून नौटंकी करत आहेत. या नेत्यांनी ही नौटंकी बंद करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी.’

तसेच सत्ताधारी- विरोधकांना जर शेतकऱ्यांप्रती खरंच कळवळा असेल तर लवकरात लवकर मदत जाहीर करावी. मदती देऊन बळीराजाला धीर द्यावा, असे गायकवाड म्हणाले. लवकरात लवकर मदत जाहीर न केल्यास राज्यभर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!