Share

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट? चित्रा वाघ म्हणाल्या…

Published On: 

पुणे : राज्यभरात गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पुणे पोलिसांसमोर तरुणीच्या आई वडिलांनी जबाब नोंदवल्याची माहिती असून आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला असल्याचं समजतं आहे.

पूजा चव्हाणच्या आई वडिलांच्या जबाबानंतर या संदर्भातील एक अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला असल्याची माहिती समोर येत आहे. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात एक एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, पुण्यात मुलीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेता संजय राठोडला पुणे पोलिसांनी क्लीनचीट दिल्याच्या बातम्या येत आहेत तसेच राज्यभरातून फोन ही येत आहेत. या संदर्भात मी स्वत: सकाळी पुणे पोलिस आयुक्तांशी बोलले असता त्यांनी स्वत: या बातमीचं खंडन केलं आहे व यात तथ्य नसल्याचं म्हंटलयं अशी माहिती वाघ यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.

पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!