मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. साराला फिरण्याची प्रचंड आवड आहे. काही दिवसांपूर्वी साराने केदारनाथ मंदिरात (Kedarnath Temple) जाऊन दर्शन घेतले होते. तर त्यापूर्वी ती महाकाल (Mahakal Temple) मंदिरातही दर्शनासाठी पोहोचली होती. फक्त मंदिर नव्हे तर सारा ही गुरुद्वारा, मशीद यासारख्या विविध प्रार्थनास्थळी दर्शनासाठी जाताना दिसते. विशेष म्हणजे या कारणावरुन साराला सोशल मीडियावर ट्रोलही केले जाते. मात्र साराने नुकतंच सर्व प्रार्थनास्थळी का जाते? त्याचे नेमके कारण काय? याबाबतचा खुलासा केला आहे.
खरं तर सारा ही धर्म, जात यासारख्या गोष्टी मानत नाही. त्यामुळे अनेकदा तिने मंदिरात दर्शन घेतेवेळी, गुरुद्वारामध्ये दर्शन घेत असताना किंवा मशीदमध्ये नमाज पडतेवेळीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यावरुन अनेकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. मात्र सारा या कोणत्याही गोष्टींची पर्वा करत नाही. नुकतंच साराने ती या सर्व प्रार्थनास्थळी का जाते? त्याचे नेमके कारण काय? याबाबतचा खुलासा केला आहे. एका मुलाखतत तिने “मी एखाद्या विशिष्ट धर्म किंवा जातीमुळे त्या ठिकाणी जात नाही.
https://www.instagram.com/p/CX1EtOMIoJ1/?utm_source=ig_web_copy_link
मी तिथे फक्त अध्यात्मासाठी जाते. मला तिथे असणारी सकारात्मक ऊर्जा आवडते. मग ती एखाद्या मंदिरातील असो, गुरुद्वारामधील असो किंवा एखाद्या चित्रपटाच्या सेटवरील लोकांकडून मिळणारी असो. मला लोकांमधील ती ऊर्जा आवडते. जी ऊर्जा कधी तिला मंदिरात तर कधी तिला दर्ग्यातून मिळते,” असे साराने म्हटले. सारा अली खानला प्रवास आवडत असल्याने अनेकदा सुट्ट्यां दरम्यान परदेशात फिरण्यासाठी जाते. त्यासोबत कित्येकदा ती धार्मिक स्थळांनाही भेट देते. यापूर्वी साराने केदारनाथ, महाकाल, आसामच्या कामाख्या मंदिराचे दर्शन घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

