मुंबई : सुरुवातीला चीनमधून जगभरात पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने मार्च पासून भारतात देखील थैमान घातला आहे. आता तब्बल ५ महिने होऊन देखील कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात करण्यात आलेली टाळेबंदी जूनपासून शिथिल केल्याने जनजीवन आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
नागरिक स्वतःची काळजी घेत आता दैनंदिन कामास सुरुवात करत असतानाच कोरोनाचा धोका मात्र अजूनही कायम आहे. मार्चपासुन केंद्रातर्फे या रोगाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार घेऊन नागरिकांमध्ये भेदभाव न करावा याबाबत जनजागृती करण्यात येत होती. दूरसंचार विभागाने देखील दूरसंचार कंपन्यांना या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी संदेश देणारी कॉलरट्यून ठेवण्याचे आदेश दिले होते.
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांसाठीची पीएमपीची बससेवा तूर्तास नाहीच! जाहीर केली ‘हि’ नवी तारीख
आता या कॉलरट्यूनला नागरिक देखील कंटाळले असून अनेकदा महत्वाच्या कामासाठी फोन करताना सुरुवातीचे सेकंद हा संदेश एकवण्यातच वेळ वाया जातो, त्यामुळे कॉल लावण्यास विलंब होतो, तर अनेकदा रिंग न वाजताच कॉल लागतो त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण होत असून आता जनजागृती पुरे! असे म्हणत ही कॉलरट्यून बंद करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi ,@MySarkarnama
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 20, 2020
काँग्रेसच्या ‘या’ युवा आमदाराला झाली कोरोनाची लागण
बाळा नांदगावकर यांनी, “कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.” असे ट्विट करत ही मागणी केली आहे.
श्रीनगर सोडा आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा, इम्रान खान यांना घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

