Share

श्रीनगर सोडा आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा, इम्रान खान यांना घरचा आहेर

Published On: 

नवी दिल्ली : पाकिस्तानात जमियत उलेमा-ए-इस्लामचे (एफ) अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान यांनी काश्मीरवरून इम्रान खान सरकारवर निशाणा साधला आहे. इम्रान सरकारचा काश्मीरवर काहीही परिणाम दिसून येत नाही. भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले. परंतु, पाक सरकार काहीही करू शकले नाही. भारताकडून श्रीनगर मिळवू, असे आम्हाला पूर्वी वाटे. मात्र, आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे, असा प्रश्न आपल्याला पडतो, असे रहमान यांनी पेशावर येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे. रहमान म्हणाले, पाकिस्तानात हुकूमशाही सुरू आहे. आम्ही त्याविरोधात लढत राहू. दुसरीकडे पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ म्हणाले, आमचा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका निभावेल. फजलूर यांच्यासोबत येऊन इम्रान सरकारच्या विरोधात कडक अजेंडा तयार करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानातील पंजाबच्या विधानसभेत पारित ‘तहफ्फज-ए-बुनियाद ए इस्लाम’ विधेयकावरून वादंग निर्माण झाले आहे. त्यात ईशनिंदा प्रकरणात ५ वर्षांपर्यंतची शिक्षा व २.२५ लाख रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. प्रकाशकांना पुस्तकांची प्रत सरकारकडे जमा करावी लागेल. हे विधेयक पाकिस्तान संविधानाच्या विरोेधात असल्याचा दावा मानवी हक्क आयोगाने केला आहे. तसे झाल्यास देशात धार्मिक सहिष्णुता व स्वातंत्र्य शिल्लक राहणार नाही. पंजाबच्या शिक्षण मंडळाने अलीकडे १०० हून जास्त पुस्तकांना देशविरोधी व धर्मविरोधी असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली होती. सरकारने सातत्याने अशा पद्धतीची कारवाई केली आहे.

सुशांतसिंग प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही, धर्मा पाटलांच्या वेळेस पाझर का फुटला नाही ?

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचे वक्तव्य पाकिस्तान सरकारला जड जात आहे. रियाधमध्ये दाखल झालेले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांना भेटण्यास सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर सौदी सरकारने रियाधमध्ये बाजवा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमही रद्द केले. बाजवा यांनी त्यांना भेटीसाठी अनेकदा वेळ मागितली. परंतु, सलमान व्यग्र असल्याचे उत्तर त्यांना ऐकून घ्यावे लागले. त्यानंतर बाजवा यांनी सौदीचे लष्कर प्रमुख फैयाद बिन हामिद अल-रूवैली यांची भेट घेतली. त्यातही गंभीर मुद्यांवर चर्चा झाली नाही. त्यामुळे बाजवा यांना रिक्त हाताने परतावे लागले. इस्लामिक राष्ट्र संघटनेने काश्मीर मुद्यावरून भारताच्या विरोधात उभे राहू नये यासाठी सौदी काम करत आहे.

राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचा रिमोट बारामतीत, भाजपचा जोरदार प्रहार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!