पुणे : गेले ५ महिने कोरोना महामारीने जगभरासह देशात देखील थैमान घातले आहे. तर, राज्यात शिरकाव केल्यापासून मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यात देखील कोरोनाने कहर घातल्यामुळे प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. आता, हळूहळू सर्व स्थिती हि सर्वसामान्य होत असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांसाठी बंद करण्यात आलेल्या पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी पीएमपीची बससेवा हि गणेश चतुर्थीपासून सुरु केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे परवानगीबाबत तशी मागणी देखील केली गेली होती. मात्र, आता पीएमपीच्या बससेवेसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडकरांना आणखी काहीशी वाट पहावी लागणार आहे.
काँग्रेसच्या ‘या’ युवा आमदाराला झाली कोरोनाची लागण
पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच आसपासच्या क्षेत्रात संयुक्तपणे निर्माण करण्यात आलेल्या पीएमपीएमएलमार्फत बससेवा पुरवण्यात येते. तर, गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सवानंतर म्हणजेच ३ सप्टेंबरपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त २५ टक्केच बसेस म्हणजे ४२१ बसेस १३ डेपोच्या अंतर्गत येणाऱ्या १९० मार्गांवर धावतील.
श्रीनगर सोडा आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा, इम्रान खान यांना घरचा आहेर
टाळेबंदीमध्ये १ जूनपासून शिथिलता देण्यात आल्यानंतर अनेक कंपन्या, व्यवसाय आदींना सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांची वर्दळ देखील वाढली असून त्यांना दळणवळण करण्यासाठी वाहतुकीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. लॉकडाऊन काळापासून पीएमपीतर्फे फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बससेवा दिली जात आहे. त्यामुळे, नागरिकांतर्फे देखील शहरांतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी मागणी वाढत होती.
सुशांतसिंग प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही, धर्मा पाटलांच्या वेळेस पाझर का फुटला नाही ?
बससेवा सुरु करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात काल बैठक पार पडली. यावेळी गणेश जयंती पासून बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी काहींनी केली, मात्र गणेशोत्सवात निर्माण होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता गणेशोत्सवानंतरच सेवा सुरु करण्यात यावी अशी भूमिका प्रशासनाने मांडली. या बैठकीला पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, दोन्ही महापालिकांचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व संतोष लोंढे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पि. चिं. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर , पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

