Share

काँग्रेसच्या ‘या’ युवा आमदाराला झाली कोरोनाची लागण

Published On: 

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी ‘त्याला काय हुतंय?म्हणाऱ्यालाच हुतंय’ असे म्हणत आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक व्हिडिओ बनवली होती. ती व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाली. आता कोरोना पासून सावध राहून काळजी घ्या असे आवाहन करणाऱ्या युवा आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोल्हापूर दक्षिणच्या विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक जिंकत आमदार झालेल्या ऋतुराज यांचा काल रात्री उशिरा कोरोना अहवाल आला. त्यात, त्यांना कोरोना झाल्याचे आता समोर येत आहे. सद्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आमदार ऋतुराज पाटील हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे व शिक्षणमहर्षी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आहेत.

श्रीनगर सोडा आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा, इम्रान खान यांना घरचा आहेर

ऋतुराज पाटील यांनी आज सकाळी स्वतः एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.”असे ट्विट त्यांनी केले.

सुशांतसिंग प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही, धर्मा पाटलांच्या वेळेस पाझर का फुटला नाही ?

कोल्हापुर जिल्ह्यात वाढणारा कोरोना प्रादुर्भाव बघता त्यांनी एका व्हिडीओमार्फत जनतेला आवाहन केले होते. या व्हिडिओला काही दिवसच झाले असताना आता आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने विळखा घातल्याचे समजते. “हे कोल्हापुर आहे, एकदा ठरलं कि ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असं म्हणत कोरोना विरोधात लढाई मिळून काळजी घेत जिंकूया असे सांगितले होते. याच व्हिडिओतील ‘त्याला काय हुतंय म्हणत काळजी न घेणाऱ्यालाच हुतंय’ , हे वाक्य प्रचंड व्हायरल हमझाले आहे.

राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचा रिमोट बारामतीत, भाजपचा जोरदार प्रहार

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!