Share

लॉकडाऊनच्या धास्तीने नागरिकांनी केली बँकांमध्ये गर्दी

Published On: 

बीड: जिल्ह्यात आधीच वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक बँकांचे कामकाज गेल्या दोन दिवसांपासून खंडित झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच मार्च-एप्रिल या दोन महिन्यात बँकांना सलग सुट्ट्या असल्याने व्यापरी तसेच नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच आज (दि.२६) पासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने लोकांनी बँकांमध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

मार्च महिन्याच्या अखेर तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँके संदर्भातील कामकाजात मोठ्या अडचणी येणार असून याचा आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. २७ मार्चला चौथा शनिवार तसेच २८ मार्चला सुट्टी आहे आणि लगेच २९ मार्चला होळीची सुट्टी त्यानंतर ३१ मार्चला आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसाची सुट्टी आहे. आता राहिला फक्त एक दिवस ३० मार्च , त्यादिवशी बॅंका नियमित सुरु राहतील. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी वार्षिक खाते बंद करायचा दिवस असल्याने त्यादिवशी बँक चालू असल्या तरी कुठले व्यवहार होणार नाहीत. २ एप्रिलला गुड फ्रायडे आणि ४ एप्रिलला रविवार.

असं एकंदरीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे गरजेचे झाले आहे. २४, २५, आणि २६ मार्चला नागरिकांना बँकांचे कामकाज करणे गरजेचे झाले आहे. पण त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी बँक ऑफ महाराष्ट्राचे कामकाज बंद होते. त्यामुळे ग्राहकांना परत फिरावे लागले. आणि आता आज पासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने बँकांतील आर्थिक व्यवहार बंद राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!