जालना : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील नागरिकांना जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाणीपुरवठा बंद असल्याने डोणगावकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणताना गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
डोणगाव ग्रामपंचायतीला चार सार्वजनिक विहिरीअसूनही नळ योजना बंद आहे. त्यामुळं गावकऱ्यांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आलीये. डोणगाव येथे जवळपास चार हजार ग्रामस्थांची वस्ती आहे. येथे दरवर्षी पाण्याचा तुटवडा भासतो. या पाणीटंचाई कडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पाणी प्रश्न मार्ग लावण्याची गरज आहे.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाई निर्माण झाल्याने डोणगावकरांपुढे पिण्याच्या पाण्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करावी आणि गावासाठीचा पाणीापुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात देशभक्ती हा गुन्हा झालाय; केंद्रीय मंत्री जावडेकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
- रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !
- काँग्रेस ‘या’ बाबतीत नक्कीच नंबर एकचा पक्ष बनेल; आशिष शेलारांचा टोला
- ‘कोणी कितीही वलग्ना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, तर समोरच्याला संपवू शकते’
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
