औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध म्हणून लसीला संशोधकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे निःसंकोचपणे सर्वांनी लसीकरण करावे, मी स्वतः लस घेतली आहे. नागरिकांनी देखील सहभाग नोंदवा, असे आवाहन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनपा लसीकरण केंद्राच्या भेटी दरम्यान केले आहे.
औरंगाबाद शहरामधील बालाजी मंदिर, कोकणवाडी, शाह बाजार आदींसह मनपा लसीकरण केंद्रांना माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेटी दिल्या. औरंगाबाद जिल्हा व्यापारी केंद्राचे बालाजी मंदिर, राजाबाजर लसीकरण केंद्र, मनपाचे शाह बाजार लसीकरण केंद्र, रोटरी क्लब व जैस्वाल महिला संघटना तर्फे कोकणवाडी येथील समाज भवन लसीकरण केंद्रांना भेटी देवून दैनंदीन लसीकरण तसेच अडीअडचणीबद्दलचा आढावा देखील घेतला.
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गाच्या संख्येचा कहर खुप मोठ्या वेगाने वाढत आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी मनपा प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन खुप प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. ४५ वर्षांच्या वरील सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. महत्वाचे काम असेल तर घराच्या बाहेर पडताना नाका – तोंडाला मास्क घालावा. हात स्वच्छ धुवावे, सॅनीटायझरचा नियमीतपणे वापर करावा. सोशल डिस्टंसिंग पाळावे असे आवाहन देखील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोना संकटात मोदी दिवसातील १८-१९ तास काम करताहेत’, मंत्री गोयल यांचा दावा
- केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे बालीश राजकारण आता थांबवावे’
- महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार
- लातूरात एकाच दिवसात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बातमी चूकीची, जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

