Share

कॅरेबीयन प्रिमीअर लिग मध्ये ख्रिस गेलचे पुनरागमन; ‘या’ संघाशी केला करार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे भारतातील आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित करण्यात आली. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर स्पर्धेतील सहभागी खेळाडू मायदेशात परतले. यादरम्यान वेस्ट इंडिज येथील टी-२० लीग कॅरेबियन प्रिमीअर लीगचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.

याच स्पर्धेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल यावर्षी सीपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. गतवर्षी झालेल्या सीपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर ख्रिस गेल या वर्षी सेंट किट्स आणि नेविस पेट्रिएट्स या संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. ख्रिस गेलने यापुर्वी याच संघासाठी दोन हंगाम खेळलेले आहे. २०१७ च्या हंगामात ख्रिस गेलच्या नेतृत्वात सेंट किट्स व नेविस पेट्रीएट्स संघाने सीपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

कॅरेबीयन प्रिमीअर लीग स्पर्धा २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत चांगल्या फॉर्मात असलेला दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू फाफ-डू-प्लेसिस हा यावर्षी सेंट लुसिया झुक्सचे प्रतिनिधित्व करेल. बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन हा या हंगामात जमैका तल्लावाह संघाकडुन खेळताना दिसेल. या स्पर्धेतील सर्व सामने हे सेंट किट्स व नेविस येथील मैदानावर खेळले जातील. येथील स्थानिक प्रशासनाने ५० टक्के प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी येण्याची परवानगी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!