Share

पंजाबकडून रवी बिश्नोईने घेतला पुन्हा एकदा नेत्रदीपक झेल; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

आहमदाबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात पंजाबने बलाढ्य आरसीबीला ३४ धावांनी नमवले. सामन्यातील दुसऱ्या डावातील आखेरच्या षटकात पंजाबचा गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. यावेळी चौथा चेंडु खेळण्यासाठी हर्षल पटेल हा स्ट्राईकवर होता. शमीने टाकलेल्या लो फुलटॉस चेंडुवर हर्षलने लॉंग ऑफच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडुच्या दिशेने पळत येत रवि बिश्नोईने झेप घेत नेत्रदीपक झेल घेतला. हा झेल पाहुन सर्वानी त्याचे कौतुक केले. सामना संपल्यानंतर हाच झेल ‘कॅच ऑफ द मॅच’ ठरला.

https://twitter.com/KartikS25864857/status/1388188875885989892

स्पर्धेत बिश्नोईने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सुनील नारिणचा अप्रतिम झेल घेतला होता. तसेच या सामन्यात बिश्नोईने ४ षटके गोलंदाजी करताना १७ धावा देत ४.२० ची इकॉनॉमी राखली. तर शाहबाज अहमद आणि डॅनीयल सॅम्स या दोघांना लागोपाठ दोन चेंडुवर बाद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!