ठाणे: महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना अगदी मित्र पक्ष झाले असले तरी देखील एकमेकांतील वाद काही ठिकाणी मात्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु आहे. खारेगाव पट्ट्यात ठाणे महापालिकेने उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात या वादाची सुरुवात झाली. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
दिवा येथील एमएमआरडीएच्या (MMRDA) घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. यावेळी बोलताना त्यांनी महापौर नरेश म्हसके (Naresh Mhaske) यांच्यावर टीका करत फटकारले आहे.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या फेसबुक पोस्टवरुन आव्हाडांनी नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? अशी विचारणा केली आह. जे एकनिष्ठेबद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे (Narayan Rane) कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले, क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आले, या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका, असे खडेबोल जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावले आहेत.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करणं, उद्धव ठाकरेंना कार्यकर्ता तुटू देऊ नका समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं, नजीबने त्यांना लपलेल्या स्थितीतील बाहेर आणणं, क्षणभर विश्रांतीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर उभं करणं आणि त्यांनी त्यांना माफ करणं याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. निष्ठा वैगेरे मला शिकवू नका, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
पटोले म्हणतात, मोदी नावाच्या गावगुंडाला पकडले, पोलिस म्हणतात कोणालाही अटक नाही…
औरंगाबाद जिल्ह्यात पोकरा योजना; ३२७ गावांसाठी १३० कोटींचा आराखडा!
आता चिरंजीवी यांची मुलगी श्रीजी घेणार घटस्फोट? जाणून घ्या नेमकं प्रकरण
“हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र


