🕒 1 min read
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच मराठा संघटनाने सेनेने राजेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली आहे. यावर संजय राऊत यांनी खंजीर खुपसला अशी भाषा कुणी करु नये असे म्हटले होते. यावरच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“‘खंजीराची भाषा करु नका,बोलताना जरा सांभाळून बोला’, मराठा संघटनांवर राऊत भडकले म्हणे. खंजीर शब्द दोघांच्याही वर्मावर भलताच आरपार खुपसला जातो वाटतं अन्यथा सर्वज्ञानी माणसाने इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान छत्रपती घराण्याचे वारस संभाजीराजे हे स्वत:हून शिवसेनेकडे मदत मागण्यासाठी गेले होते. मात्र, शिवसेनेने त्यांना सन्मानित करण्याऐवजी उमेदवारी नाकारली. असे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे. तर गेल्या १५ दिवसांमधील घडामोडी समजून घ्या. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- देशमुख, मलिक तुरुंगात, आता अनिल परबांनी तयार राहावे – किरीट सोमय्या
- IPL 2022 LSG vs RCB : लखनऊची एक्झिट..! कॅप्टन राहुलनं सांगितलं संघाच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “खराब…”
- “चंद्रकांत पाटील यांची भाषा मनुवादी संघाच्या शिकवणीची”, ‘त्या’ वक्तव्यावरून सचिन सावंत यांची टीका
- सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू – संजय राऊत
- छत्रपती संभाजी राजेंना मनसेचा पाठिंबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
