Share

सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे, असेही पाटील म्हणाले आहेत.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा दारू सहज उपलब्ध असेल. त्यामुळे रेशनदुकानापासून सगळीकडे दारू उपलब्ध करण्याचा निर्णय व्यसनमुक्तीसाठी आयुष्यभर झटणारे डॉ. अनिल अवचट गेले त्याच दिवशी मविआ सरकारने घेतला आहे’, असे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली काल(२७ जाने.) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!