Share

“…हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय”, अन्सारींच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय अमेरिकन मुस्लिम कौन्सिलने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी(Hamid Ansari) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत. यावेळी अन्सारी यांनी भारतातील मानवाधिकारांबाबत वक्तव्य केले. तसेच मागील काही वर्षांमध्ये आम्ही अशा प्रवृत्ती आणि वर्तनांचा उदय पाहिला आहे जे पूर्वीच्या प्रस्थापित नागरी राष्ट्रवादाच्या विरोधात आहेत. तसेच ते सांस्कृतिक राष्ट्रवादाची काल्पनिक व्यवस्था लागू करू इच्छितात, असे अन्सारी म्हणाले. दरम्यान, अन्सारी यांच्या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी परकीय भूमीवरून भारतातील मानवाधिकारांच्या बाबतीत ओकलेल्या गरळेवरून बहुजन समाज पार्टी सकट सगळ्या राष्ट्रवादी संघटनांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय’, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सध्या काळात निवडणुकीतील बहुमताला धार्मिक बहुमत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच राजकीय सत्तेवर एकाधिकारशाही लागू करण्याची त्यांची इच्छा आहे. नागरिकांत त्यांच्या आस्थेच्या आधारावर फूट पाडण्याची आणि असुरक्षिततेला प्रोत्साहन देताना असे लोक दिसतात’, असे अन्सारी म्हणाले. तसेच अन्सारी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!