Share

Chitra Wagh | “कंगना रणावत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?” चित्र वाघ यांचा सवाल

Published On: 

Chitra Wagh | मुंबई : शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. सर्व स्तरातून सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीने ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर रान उठवलेलं असताना त्यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यासंदर्भातला व्हिडीओही त्यांनी ट्वीट केला आहे.

त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेचा आदर-सन्मान व्हायला हवा. महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. पुरुषांनी तर सन्मानच केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून मी वाट्टेल ते बोलेन आणि त्याला जर उत्तर आलं तर महिलांची अस्मिता दुखावली गेली असं म्हणत असाल तर ते बरोबर नाही. दोघांनीही एकमेकांचा आदर-सन्मान ठेवायला हवा. उत्तराला प्रत्युत्तर असतं”, अशी प्रतिक्रिया चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी दिलीय.

माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या विधानांचा उल्लेख केला आहे. “गेल्या अडीच वर्षांत काही का केलं नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणं हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

“मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधात संताप कितपत योग्य? कंगना रणावत , स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा”, अशा आशयाचं ट्विट चित्र वाघ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!