🕒 1 min read
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा काल(२४ जाने.)भाजप नेत्यांनी जोरदार समाचार घेतला होता. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत. संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे डोक्यावर परिणाम झालाय..गिरे तो भी टांगे उपर… अशी काहीशी त्यांची अवस्था झालीय’, असे वाघ म्हणाल्या आहेत.
शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचं संजय जी राऊत म्हणताहेत…
संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे डोक्यावर परिणाम झालाय..
गिरे तो भी टांगे उपर… अशी काहीशी अवस्था झालीय यांची… !!— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2022
दरम्यान, राम जन्मभूमी आंदोलनामध्ये फक्त भाजपचा सहभाग होता शिवसेनेचा नव्हता, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, ‘कोणी काहीही म्हटलं तरी इतिहास आहे, दस्ताऐवज आहे. साक्षी पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना त्यामध्ये गुन्हेगार केलं होतं. शेकडो कारसेवक मुंबईतून गेले. त्याला कोणताही राजकीय पक्ष त्यावेळी नव्हता. त्या काळातला सामना पाहिला तर कारसेवकांची यादी आम्ही दिली आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणाला, ‘जय श्री राम’
- तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर
- Good News : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन
- भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना ठरली आयसीसी २०२१ “वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर “
- मी काय आणि कोण हे सलमानला वेळ आल्यावर दाखवून देईन-अभिजीत बिचुकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

