🕒 1 min read
Chitra Wagh । यवतमाळ : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात यवतमाळचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) दोषी असल्याचा ठपका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठेवला होता. मात्र आता स्वतः चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीच यातून यु टर्न घेतलेला दिसत आहे.
“संजय राठोड हा विषय आता संपवूया”, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काल म्हंटल होतं. त्या चित्रा वाघ आज यवतमाळ दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी देखील त्यांना संजय राठोड प्रकरणाबाबतचा सवाल करण्यात आला. यावेळी मात्र त्या चांगल्याच भडकल्या.
भडकलेल्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांना झापलं. त्या म्हणाल्या, “न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हू ना न्यायालय में. आप मुझको मत सिखाईये.” पुढे त्या म्हणाल्या , असल्या पत्रकारांना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात, असं म्हणत चित्रा वाघ पत्रकार परिषदेतून निघून गेल्या.
काय आहे प्रकरण?
टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असणारी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातल्या वानवडी परिसरात 7 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या कथित फोन संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील भाजपने सादर केल्या होत्या. त्यांनतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. जून-जुलै 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे-भाजप सरकार आलं. एकनाथ शिंदे गटात संजय राठोड शामिल झाले. यांनतर चित्र वाघ यांची भूमिका काय असणार याकडं सर्वांच्या नजर लागल्या होत्या. यावर त्यांनी हा लढा न्यायालयात सुरु ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “शरद पवारांनी जादुटोणा केल्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; म्हणाले,
- Ajit Pawar | “मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही…” ; अजित पवार यांचे स्पष्टीकरण
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांना अटक! राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
- Hera Pheri 3 | ‘हेरा फेरी 3’ मध्ये दिसणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता
- Jitendra Awhad Arrest | मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं प्रकरण काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
