Share

Rohit Pawar | “शरद पवारांनी जादुटोणा केल्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; म्हणाले,

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | अहमदनगर :  भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शरद पवार भोंदूबाबा असून त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असल्याचं बावनकुळे म्हणालेत. यावर रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी डॉ. नरेंद्र दाभोलळकर यांचा फोटो ट्विट करत बावनकुळेंना चांगलंच सुनावलं आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला त्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या साताऱ्यात भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान आहे.”

पुढे ते म्हणतात, “आता याबाबत राज्य सरकार काय करतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय! राज्यातले प्रकल्प गुजरातला नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला मागं आणण्याचा प्रयत्न तर भाजपकडून सातत्याने होतच आहे, पण विचारांच्या बाबतीतही महाराष्ट्राला मागं आणण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसतोय,” असा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत. त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. शरद पवार हेच या जादूटोण्याचे भोंदूबाबा असल्याचं ते अप्रत्यक्षपणे म्हणाले. एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!