मुंबई : असं म्हणतात, ”माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो” त्याचप्रमाणे खाण्याच्या पद्धतीतून खाणाऱ्याचे आणि खाऊ घालणाऱ्याचे संस्कार दिसतात. अशीच एक अनोखी शक्कल लढवत एका हॉटेल चालकाने हटके मेनु कार्ड बनवलं आहे. हे मेनु कार्ड पाहील्यानंतर ही लग्नाची पत्रिका (Wedding card) आहे की, मेनु कार्ड (Invitation card) आहे असा प्रश्न पडला नाही तरच नवल!. हीच पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून याबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान सोशल मीडियावरील ही पत्रिका म्हणजेच मेनु कार्ड पाहून लग्नाला जावं की, खाण्यासाठी जावं अशी चर्चा मात्र रंगत आहे. ही बातमी वाचून तोंडला पाणी सुटणार अशीच त्यांची अपेक्षा असावी. म्हणून या मेनु कार्डमुळे अस्सल मराठी पदार्थांनी जगातील खवय्यांना चांगलेच वेड लावलयं. त्या पत्रिकेतील मचकूर देखील मनोरंजनात्मक पध्दतीने मांडणी करण्यात आली आहे.

व्हायरल पत्रिकेबद्दल सांगायच झाल्यास पुण्यातील (Pune) सिंहगड परीसरात हॉटेल अतिथी बोरूळच्या मालकांनी हॉटेलच्या मेनु कार्डला लग्न पत्रिकेचं स्वरूप दिलं आहे. यामध्ये त्यांनी थेट मटनाला वर तर चिकनला वधू (Chiranjeev Mutton and Ch. Mrs. Chicken’s) बनवल्याचं दिसतंय. संपुर्ण पत्रिकेत वेगवेगळ्या पदार्थांची नावं आयोजक, कार्यवाहक, व्यवस्थाक मंडळीमध्ये देण्यात आली आहे. यामुळे नावाप्रमाणेच चमचमीत पदार्थांची नावं वाचून खवय्यांना ‘खाने का बहान’ नक्कीच मिळाला आहे. या अनोख्या मेनु कार्ड सोबतच हॉटेलचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलमधल्या गरमागरम भाकरी आणि चिकनच्या चवीबद्दल चांगलीच चर्चा रंगत आहे. त्यामुळे या परिसरातील नॉन व्हेज आवडणाऱ्या खवय्यांची इथे मोठी गर्दी होत असून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

