नवी दिल्ली : मागील दीड वर्ष्यांपासून कोरोना महामारीने अवघ्या जगाला अडचणीत आणले आहे. भारतमध्ये तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. यामुळे आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली. तर, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यूचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे अनेक कुटुबांचा आधार गेला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट होत आहे.
आता ज्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला अशा चीननं आता जगभरातील देशांना कोरोना विरोधी लस मोफत देण्याची भाषा केली आहे. चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी यंदाच्या वर्षात जगभरातील विविध देशांना कोरोना विरोधी लसीचे २०० कोटी डोस मोफत देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. कोरोना विरोधी लसीच्या निर्यातीत जगात सर्वात अग्रेसर देश म्हणून चीन स्वत: जागतिक पातळीवर प्रतिमा तयार करू इच्छित आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे जगभरात लस पुरवठा करण्याच्या धोरणावर अधिक भर देत आहे. ते म्हणाले की, ‘या महिन्याच्या अखेपर्यंत जगातील वेगवेगळ्या देशांपर्यंत दोन अब्ज लस पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.’ दरम्यान चीनच्या राष्ट्रपतींनी हे नाही सांगितले की, बीजिंग यामधून किती लस विक्री करेल आणि किती गरीब देशांना मोफत देईल. तसेच कशाप्रकारे लसीचा पुरवठा केला जाईल.चीनीच्या राष्ट्रपतींनी हा संदेश एका व्हिडिओ मॅसेजच्या माध्यमातून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्यांचा आणि आमचा हिंदुत्वाचा समान धागा, मात्र…; ठाकरे-पाटील भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- प्रतिस्पर्धी ग्रेट ब्रिटनने वाढवले भारतीय महिला संघाचे मनोबल म्हणाले…
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

