मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? हे प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालेले आहे. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो. या भेटीत परप्रांतीयांच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. राज यांनी क्लिप दाखवली. युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसदर्भात चर्चा झाली असं पाटील यांनी सांगितले आहे.
यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक इतकाच आहे, त्यांची परप्रांतियांशी जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही,’ असं फडणवीस म्हणाले.
मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असतील तर आनंदच – नांदगावकर
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीबाबत मोठं विधान केलं आहे. मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. त्यामुळे मनसेतील नेते सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमृता फडणवीस यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, म्हणून त्यांनी ‘हे’ करावे’
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- प्रतिस्पर्धी ग्रेट ब्रिटनने वाढवले भारतीय महिला संघाचे मनोबल म्हणाले…
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

