Share

नारायण राणेच्या मुलांसारखी मुले कुणाच्या पोटी येऊ नये- भास्कर जाधव

Published On: 

मुंबई: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर निशाना साधत नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत.असे म्हटले आहे. नारायण राणे यांची मुले नितेश राणे आणि निलेश राणे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भास्कर जाधव यांनी यावरूनच नारायण राणेवर टीका केल्याचे दिसून येते.

नारायण राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात. मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. नारायण राणेंना माध्यमांनी मोठं केलं आहे आणि शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन त्यांनी आपलं अस्तित्व टिकवलं आहे. यापेक्षा नारायण राणेंचा काही करिश्मा नाही असा टोला लगावला आहे.

त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचं वर्षश्राद्ध घातलं. स्वतःच्या मुलाला निवडूण आणू शकत नाही म्हणून भाजपाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार आणि कसली पाळमुळं रोवणार असा टोला लगावत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना चांगलेच सुनावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!