🕒 1 min read
मुंबई : पती राज कौशलच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी अभिनेत्री मंदिरा बेदी ही दु:खातून स्वत:ला सावरले. शिवाय आपल्या दोन मुलांची काळजी घेत आहे. एवढेच नाही, तर अभिनेत्री एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडली आणि त्यानंतर काही दिवसांनी कामावरही परतली. यामुळे चाहत्यांनी अभिनेत्रीचे जोरदार कौतुक केले.
दरम्यान जून २०२१ मध्ये अभिनेत्रीने आपला पती राज कौशलला कायमचे गमावले. एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडली आणि त्यानंतर काही दिवसांनी कामावरही परतली. आता मंदिरा’द लव्ह लाईफ’ शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसली आहे. मंदिराने पती राज कौशलच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी एक मुलाखत दिली असून ज्यात तिने तिच्या मुलांना तिची ताकद असल्याचे सांगितले आहे. तसेच ती तिच्या मुलांसाठी वडीलही बनत आहे. ‘माझ्यासाठी माझी मुले माझी प्रेरणा आहेत. मला माझ्या मुलांकडून काम करत राहण्यासाठी, स्वतःला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. मी फक्त त्यांच्यासाठी सर्व काही करत आहे. मी माझ्या मुलांसाठी जिवंत आहे. ते माझी ताकद आहेत,असे ही व्यक्त केले.
४९ वर्षीय मंदिराने टीव्ही मालिका आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नाही, तर तिने २००३ आणि २००७ मध्ये क्रिकेट विश्वचषकाचे होस्टिंग केले होते. तुम्ही नेहमी तुमच्या शेवटच्या कामासाठी ओळखले जातात. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, त्याचा अनुभव अद्भुत असतो. जेव्हा तुम्ही अपयशाच्या काळात जगत असता, तेव्हा मग जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुमचा विचार बदलतो, असे सांगत या कठीण काळात देखील तिने जिद्द, परिश्रमाने जगण्याची उर्मी दाखवून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सीईओंनी कसली कंबर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
