मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या आगामी अॅक्शन थ्रीलर धाकड चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो नुकतेच शेअर केले आहे. त्याने नुकतेच आपले या चित्रपटाचे शूटिंग संपले असल्याचे जाहीर केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत देखील दिसणार आहे.
आपले शूटिंग पूर्ण होताच त्याने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केले आहेत. अर्जुनने कंगना तसेच सगळ्या टिमसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत अर्जुनचा लुक वेगळा दिसत आहे. त्यामुळे आता एका वेगळ्या अंदाजात अर्जुनला पहायला मिळणार असल्याचे समजते आहे.
https://www.instagram.com/p/CRbTzq5tkpr/?utm_source=ig_web_copy_link
फोटो शेअर करत अर्जुनने एक खास संदेश देखील लिहिला आहे. तसेच त्याने अनुभव देखील सांगितला आहे. तो म्हणाला, टीम तसेच इतर सहकारी यांच्यासोबत मी घेतलेल्या आठवणी खास आहेत. सॉरी कारण कंगना रानौतचा फोटो पाहायला मिळत नाही आहे. कारण तिचा लूक दिसत नव्हता. माझ्या व्यक्तीरेखेचा फोटो अजून शेअर करू शकलो नाही. तुमच्यासोबत काम करणे आश्चर्यकारक होते. कंगना रनौतच्या भुमिकेचा लोकांवर एक वेगळ प्रभाव पडलेला यात पहायला मिळेल. असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत पावसाचं रौद्ररूप : महापौर म्हणतात, ‘तीन-तीन वेळा जाऊन इशारा दिला, पण…’
- काँग्रेसला डच्चू देत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता ? संजय राऊत म्हणाले…
- ‘अमोल कोल्हे फार डोकं चालवू नका; ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलात, त्यांनाच विसरलात’
- ‘मी राज्याचा अध्यक्ष; पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतात’
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…


