Share

देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी

Published On: 

पुणे : देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी असणार आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 19 जुलैला एसटीने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यावेळी भाविक दर्शनासाठी देहू, आळंदी सह पालखी मार्गावर गर्दी करण्याची शक्यता आहे.

खबरदारी उपाय म्हणून त्या दिवशी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने,डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी,ऍम्ब्युलन्स सेवा याना ह्या जमावबंदी मधून वगळण्यात आले आहे. तसेच देहूगाव, आळंदी मधील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!