🕒 1 min read
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) पुन्हा देशाच्या अव्वल पाच मुख्यमंत्र्यांच्या पैकी एक आले आहेत. शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनाच्या दिवशी सर्वात गोड बातमी ती हीच, अभिनंदन साहेब. बाकी विरोधकांची पोटदुखी मी लाल शाईने अधोरेखित केली आहेच. भाजपच्या मंडळींना कारभार सुधारण्याला वाव आहे. अशा प्रकारची ट्विट करत औरंगाबाद चे आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी भाजपवर टीका करत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.
#मुख्यमंत्री #उद्धवसाहेब #ठाकरे पुन्हा देशाच्या अव्वल पाच मुख्यमंत्र्यांच्या पैकी एक. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनाच्या दिवशी सर्वात गोड बातमी ती हीच! अभिनंदन साहेब!
बाकी विरोधकांची पोटदुखी मी लाल शाईने अधोरेखित केली आहेच! कारभार सुधारण्याला वाव आहे म्हणजे भाजपच्या मंडळींना.. pic.twitter.com/44R7iyWGmG
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 23, 2022
याबाबत आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विट करत अभिनंदन व्यक्त केले आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी ही गोड बातमी आल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा चांगला समाचार घेतला. आता तरी तुम्हाला कारभार सुधारण्याला वाव आहे. असे म्हणत भाजपचा एकही मुख्यमंत्री या यादीत समाविष्ट नाही. याबाबत त्यांनी बातमी शेअर करत लाल शाईने त्या बातमीला अधोरेखित केले आहे.
चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टिका
यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, कोणत्या निकषावर मुख्यमंत्री पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात. आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
-
“जे आपल्या उमेदवारांवर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?”
-
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
-
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
-
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
-
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
