Share

पोलिसांचा धोका वाढतोय ! कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या संकटात खंबीरपणे उभी असलेली पोलीस यंत्रणा आता कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 88 अधिकार्‍यांसह तब्बल 698 अंमलदार अशा एकूण 786 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राज्यात कोरोना बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असलेल्या 88 पोलीस अधिकार्‍यांसह 698 अंमलदार अशा एकूण 786 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 7 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून 13 अधिकार्‍यांसह 63 अंमलदार असे एकूण 76 पोलीस उपचारांअंती कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 75 अधिकार्‍यांसह 628 अंमलदार अशा एकूण 703 कर्मचार्‍यांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

दरम्यान मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलिसांचा आकडा 200 पार झाला असून चार पोलिसांचा यात मृत्यू झाला आहे.

पोलीस, आरोग्य कर्मचारी, आणि पत्रकार हे सेवेसाठी कोरोनाच्या संकटातही कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर आणि काही पोलिसांना देखील आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठीच प्रशासन वारंवार नागरिकांना घरी सुरक्षित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!